Tuesday, November 21, 2017
Monday, November 20, 2017
३५०० रुपयात खरच ३० हजाराचा मोबाईल मिळतो का
आजकाल WhatsApp वर अनेक ऑफर्स चे मेसेज येत असतात. ऑफर्स कोणाला नको असतात? सर्वांनाच पाहिजेत. आणि खास ऑफर असेल तर share करायला तर अजून उत्साह येतो. पण आपण share करण्याच्या नादात कोणाला फसण्यास कारण ठरतोय का हे पाहायला पाहिजे.
आता आपण पाहूया ऑफर खोटी कशी ओळखावी. अनेक मेसेज मध्ये तुम्हाला तो मेसेज share करावे लागेल असे म्हटलेले असते. दिलेली वेब साईट ओपन केल्यावर तुम्हाला एवढ्या लोकांना किंवा ग्रुप मध्ये मेसेज forward करा असे सांगितले जाते. आता महत्वाची बाब अशी कि तुम्ही तो मेसेज किती लोकांना share केलाय हेच मुळी त्या वेब साईट ला कळत नसते. तुम्ही फक्त त्यांच्या share च्या बटन वर click केले कि तुम्ही share केले असे मोजले जाते. म्हणून तुम्ही share च्या बटन वर click केल्यावर share न करताच back करायचे. असे साईट ने सांगितल्या वेळा केले कि नंतर साईट पुढे जाईल. पुढे तुम्हाला काही विश्वासपात्र नसलेले app download करायला सांगितले जातील. हे app download केल्याने त्या साईट च्या owner ला पैसे मिळतात. पण हे app धोकादायक असू शकतात. नंतर तुम्हाला ऑफर बद्दल कळविले जाईल असे सांगितले जाते किंवा अजून काही माहिती किंवा पैसे मागितले जातात. काही लोक तर तुमची वस्तू कुरियर ने पाठवतात हि, पण त्यात दगड किंवा इतर काही निघते. अशा प्रकारे तुमची फसवणूक तर होतेच पण तुमच्या मुले तुम्ही ज्या लोकांना मेसेज forward करता त्या लोकांना देखील याचा सामना करावा लागतो.
हे तर झाले वैधानिक (legal) उपयोगाबद्दल, पण hacker/criminal लोकांना याचे इतरही उपयोग आहेत. विचार करा तुमची वैयक्तिक माहिती, जसे तुम्ही कधी कोणता प्रवास करणार आहात, तुम्हाला कोणता रोग आहे, तुमच्या family मध्ये कोण कोण आहे, ते काय काय करतात हि माहिती त्यांना मिळाल्यावर कसे होईल. आणि हि माहिती त्यांना सहज तुमच्या handset मधून मिळते. म्हणून मोबाईल मध्ये आवश्यक नसलेले व विश्वासपात्र नसलेले app त्वरित काढून टाकायला पाहिजे.ऑफर्स येताच असतात आणि येताच राहतील, पण खरी कोणती आणि खोटी फसवी कोणती हे कसे ओळखावे हा प्रश्न आत्ता तुमच्या मनात येत असेल तर त्याचे उत्तर शेवटी मिळेल. पण हे जाणून घ्या कि तुम्हाला फसवून कोणाला काय मिळेल असे तुम्हाला वाटू नये. कारण पुढे येत असलेल्या digital युगामध्ये तुमची माहिती गुन्हेगारांसाठी फार महत्वाची आहे. तुम्हाला अनेक जाहिरातीचे फोन व sms येत असतात. त्यांना काय माहिती कि तुम्हाला ठरावीक याच गोष्टीमध्ये interest आहे आणि इतर गोष्टी मध्ये नाही? का तुम्हाला खास करून विमान प्रवासात कामी येणाऱ्या वस्तूंची जाहिरात न दाखवता ट्रेन मध्ये कामी येणाऱ्या वस्तूंची जाहिराती दिसतात? कारण तुम्हाला काय आवडतंय, तुमच्याकडे काय आहे, तुम्ही कोठे राहता हे जाहिरातदारांसाठी फार उपयोगी आहे जेणेकरून त्यांचे जाहिरातीवरील budget वाया जाऊ नये. आत्ता सध्या या blog वरील जाहिराती बघा, त्या तुमच्या आवडीच्याच विषयानुसार नाहीत का? (नाही त्या मी select केलेल्या नाहीत, त्या google कडून आलेल्या आहेत) google चा मुख्य व्यवसाय जाहिरातीच आहेत आणि त्यासाठीच ते तुम्हाला अनेक चांगल्या चांगल्या सुविधा फ्री देऊ शकतात.
आता आपण पाहूया ऑफर खोटी कशी ओळखावी. अनेक मेसेज मध्ये तुम्हाला तो मेसेज share करावे लागेल असे म्हटलेले असते. दिलेली वेब साईट ओपन केल्यावर तुम्हाला एवढ्या लोकांना किंवा ग्रुप मध्ये मेसेज forward करा असे सांगितले जाते. आता महत्वाची बाब अशी कि तुम्ही तो मेसेज किती लोकांना share केलाय हेच मुळी त्या वेब साईट ला कळत नसते. तुम्ही फक्त त्यांच्या share च्या बटन वर click केले कि तुम्ही share केले असे मोजले जाते. म्हणून तुम्ही share च्या बटन वर click केल्यावर share न करताच back करायचे. असे साईट ने सांगितल्या वेळा केले कि नंतर साईट पुढे जाईल. पुढे तुम्हाला काही विश्वासपात्र नसलेले app download करायला सांगितले जातील. हे app download केल्याने त्या साईट च्या owner ला पैसे मिळतात. पण हे app धोकादायक असू शकतात. नंतर तुम्हाला ऑफर बद्दल कळविले जाईल असे सांगितले जाते किंवा अजून काही माहिती किंवा पैसे मागितले जातात. काही लोक तर तुमची वस्तू कुरियर ने पाठवतात हि, पण त्यात दगड किंवा इतर काही निघते. अशा प्रकारे तुमची फसवणूक तर होतेच पण तुमच्या मुले तुम्ही ज्या लोकांना मेसेज forward करता त्या लोकांना देखील याचा सामना करावा लागतो.
इंटरनेट वापरताना online युगात केवळ आपले common sense आपल्याला वाचवू शकते असे एका मोठ्या antivirus कंपनीच्या engineer ने सांगितले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
Event Number Event Description End Date End time Purchasing Group Estimated Cost ...
-
Hp Elite 6200 Small Form Factor Desktop PC Intel core i3 2nd Gen eration 500gb Hard Disk 4 gb DDR3 RAM Dvd Writer Win 7 pro l...
-
Event Number Event Description Purchasing Group Estimated Cost End Date End time ...